Join us

शेअर बाजार आपटला; तेजी संपुष्टात

By admin | Updated: December 19, 2015 01:19 IST

२0१५-१६ या वित्तीय वर्षासाठी आर्थिक वृद्धीदराचा अंदाज घटविण्यात आल्याने शेअर बाजारातील तेजी संपुष्टात आली असून, सेन्सेक्स २८५ अंकांनी घसरून बाजार बंद झाला.

मुंबई : २0१५-१६ या वित्तीय वर्षासाठी आर्थिक वृद्धीदराचा अंदाज घटविण्यात आल्याने शेअर बाजारातील तेजी संपुष्टात आली असून, सेन्सेक्स २८५ अंकांनी घसरून बाजार बंद झाला.त्यातच तेलासह अन्य वस्तूंच्या किमती घसरल्याने आगीत तेल ओतले गेले. परिणामत: अनेक कंपन्यांच्या शेअर्सची गुंतवणूकदारांनी विक्री केली.बाजाराची सुरुवातच निराशाजनक राहिली आणि पूर्ण दिवसभर दडपण कायम राहिले. शेवटी सेन्सेक्स २८४.५६ अंकांनी घसरून २५,५१९.२२ अंकांवर बंद झाला. गेल्या ४ व्यावसायिक सत्रांत सेन्सेक्स जवळपास ७६0 अंकांनी वधारला होता.त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा ‘निफ्टी’सुद्धा ८२.४0 अंकांनी घसरून ७,७६१.९५ अंकांवर बंद झाला. दिवसभर तो ७,७५३.५३ आणि ७,८३६.१५ दरम्यान फिरत राहिला. अन्य आशियायी बाजारात चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान येथेही घसरण होऊन सेन्सेक्स १.९0 टक्क्यापर्यंत खाली आला. सेन्सेक्समधील सर्वाधिक घसरण वेदांताची ३.२१ टक्क्यांनी झाली.अन्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये ल्युसिन २.१0 टक्के, इन्फोसिस १.९0 टक्का, एसबीआय १.८८ टक्का, बजाज आॅटो १.६७ टक्का, हिंदाल्को १.६६ टक्का, रिलायन्स इंडस्ट्रीज १.६२ टक्का, सन फार्मा १.५१ टक्का, डॉक्टर रेड्डीज १.४५ टक्का, एच.डी.एफ.सी. १.३७ टक्का, भेळ १.२१ टक्का, टाटा मोटर्स १.२१ टक्का घसरले.