Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदार हवालदील

By admin | Updated: January 6, 2015 17:34 IST

शेअर बाजार आज तब्बल ८५५ अंकानी गडगडला असून या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल १ लाख ३१ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ६ - आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची घटलेली किंमत, युरोवरील संकट आणि त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक मंदीचे सावट याचा फटका आज शेअर बाजाराला बसला. शेअर बाजार आज तब्बल ८५५ अंकानी गडगडला असून या त्सुनामीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल १ लाख ३१ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
नवीन वर्षांतही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाची किंमत घटतेच आहे. यात भर म्हणजे युरोवरही आर्थिक संकट आले आहे. याचे परिणाम आज मुंबईच्या शेअर बाजारावर झाले. सेंसेक्स आज ८८५ अंकांनी घसरुन २६, ९८७ अंकांवर बंद झाला. ६ जुलै २००९ नंतर एकाच दिवशी शेअर बाजारामध्ये ऐवढी मोठी घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. निफ्टीमध्येही आज २५१ अंकाची घशरण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक तेल आणि गॅस उत्पादक कंपन्यांच्या शेअर्सवर झाले आहे. ओएनएजसीच्या शेअर्सच्या दरात सुमारे ६ टक्क्यांची घसरण झाली.