Join us

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला

By admin | Updated: April 20, 2015 15:36 IST

शेअर बाजाराने तीन आठवड्यातील नीचांक गाठला असून सोमवारी सेन्सेक्समध्ये ५५० अंशाची घसरण झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - शेअर बाजाराने तीन आठवड्यातील नीचांक गाठला असून सोमवारी सेन्सेक्समध्ये ५५० अंशाची घसरण झाली आहे. तंत्रज्ञान,  बांधकाम, ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्याने निर्देशांक घसरल्याचे सांगितले जात आहे. 
सोमवारी शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये ५५० अंशांची घसरण झाली असून सेन्सेक्स २७,८८६ अंशावर बंद झाला. ५  तर निफ्टीही१५७. ९० अंशांनी घसरुन  ८,४४८ अंशावर बंद झाला. संसदेचे अधिवेशन आज सुरु झाले असून या अधिवेशनात भूसंपादन, जीएसटी असे महत्त्वपूर्ण विधेयक मांडले जाणार आहेत. त्यामुळे संसदेत होणा-या निर्णयावर शेअर बाजाराचे लक्ष लागले आहे असे तज्ज्ञांनी सांगितले.