मुंबई : मुंबई शेअर बाजार उसळी घेऊन २८ हजार अंकांच्या वर गेल्याने शेअर बाजारातील भांडवलाचे मूल्यही पुन्हा एकदा १00 लाख कोटी रुपये झाले आहे. सेन्सेक्समधील एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, आरटीएल, एसबीआय, एचडीएफसी बँक, एल अँड टी या कंपन्यांना आजच्या तेजीचा उत्तम लाभ झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी २८ कंपन्यांचे समभाग वाढले. मुंबई शेअर बाजाराने जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार, काल विदेशी गुंतवणूकदारांनी ६९.७ कोटी रुपयांचे समभाग विकले. दरम्यान, आज बाजाराची एकूण व्याप्ती सकारात्मक राहिली. १,७२0 कंपन्यांचे समभाग वर चढले. १,१७४ कंपन्यांचे समभाग घसरले. बाजारातील एकूण उलाढाल ४,३0५.५५ कोटी रुपये इतकी राहिली. काल ती ३,२0५.६२ कोटी रुपये होती. शेअर बाजारात संपूर्ण दिवससभर उत्साह दिसून आला.
शेअर बाजारातील भांडवलाचे मूृल्य १०० लाख कोटींवर
By admin | Updated: January 16, 2015 05:33 IST