Join us

शेअर बाजारात तेजी; निर्देशांकात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 02:32 IST

परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजाराचा संवेदनशिल निर्देशांक ४७८ अंशांनी वाढला.

मुंबई : जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले सकारात्मक वातावरण तसेच परकीय वित्तसंस्थांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजाराचा संवेदनशिल निर्देशांक ४७८ अंशांनी वाढला.सकाळपासून तेजीचे वातावरण होते. संवेदनशिल निर्देशांक सुमारे २०० अंश वर जाऊन खुला झाला. दिवसअखेरीस तो ३८५२८.३२ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ४७७.५४ अंशांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक १.२३ टक्के म्हणजेच १३८.२५ अंशांनी वाढून ११३८५.३५ अंशांवर बंद झाला.