Join us

शेअर बाजारातील तेजीला ब्रेक

By admin | Updated: April 23, 2016 03:14 IST

गेल्या सात व्यावसायिक सत्रांत शुक्रवारी शेअर बाजारात प्रथमच तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ४२ अंकांनी घसरला, तर निफ्टीही ७९00 अकांच्या खाली नोंदला गेला

मुंबई : गेल्या सात व्यावसायिक सत्रांत शुक्रवारी शेअर बाजारात प्रथमच तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स ४२ अंकांनी घसरला, तर निफ्टीही ७९00 अकांच्या खाली नोंदला गेला. सेन्सेक्स दिवसभर खाली-वर होत राहिला आणि शेवटी ४२.२४ अंकांनी घसरला. २४,८३८.१४ अंकांवर बाजार बंद झाला. ५0 शेअर्सचा निफ्टीही १२.७५ अंकांनी घसरून ७९00 च्या खाली म्हणजे ७,८९९.३0 वर बंद झाला. आशियायी बाजारात जपानचा निक्केई १.२0 टक्के, चीनचा शांघाय कंपोझिट 0.२३ टक्के तेजीत राहिले.