Join us  

वाहनांवर आता लागणार इंधन प्रकारानुसार स्टीकर्स

By अोंकार करंबेळकर | Published: August 14, 2018 6:20 AM

वाहनांमधील इंधनाच्या प्रकाराचा संकेत देण्यासाठी वेगवेगळ्या रंगातील होलोग्राम आधारित रंगीत स्टिकर लावण्याचा केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वीकारला आहे.

नवी दिल्ली : वाहनांमधील इंधनाच्या प्रकाराचा संकेत देण्यासाठी वेगवेगळ्या रंगातील होलोग्राम आधारित रंगीत स्टिकर लावण्याचा केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्वीकारला आहे.न्यायमूर्ती मदन बी. लोकुर, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने मंत्रालयाला स्पष्ट केले की, होलोग्राम आधारित हलक्या निळ्या रंगाचे स्टिकर पेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी असेल, तर नारंगी रंगाचे होलोग्राम आधारित स्टिकर डिझेल वाहनांवर लावले जाईल.न्यायालयाने मंत्रालयाला सांगितले की, दिल्ली परिसरात चालणाऱ्या वाहनांसाठी रंगीत स्टिकर वापरण्यास ३० सप्टेंबरपर्यंत सुुरुवात करावी. मंत्रालयाकडून हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नाडकर्णी यांना न्यायालयाने सांगितले की, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांसाठी हिरव्या रंगाच्या नंबरप्लेटचा वापर करण्याबाबत विचार केला जावा. वायू प्रदूषणाबाबत न्यायमित्राची भूमिका पार पाडत असलेल्या अ‍ॅड. अपराजिता सिंह यांनी यापूर्वी सूचना केली होती की, वाहनांमधील इंधनाची ओळख होण्यासाठी रंगीत स्टिकरचा उपयोग केला जावा. (वृत्तसंस्था)

टॅग्स :कारपेट्रोल पंप