Join us

‘नीलाचल’ला इस्पात सुरक्षा पुरस्कार

By admin | Updated: March 23, 2017 00:37 IST

ओडिशातील नीलाचल इस्पात निगम लि. कंपनीला यंदाचा मानाचा इस्पात सुरक्षा पुरस्कार मिळाला आहे.

भुवनेश्वर : ओडिशातील नीलाचल इस्पात निगम लि. कंपनीला यंदाचा मानाचा इस्पात सुरक्षा पुरस्कार मिळाला आहे. कंपनीने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. कंपनीने आपल्या एकात्मिक पोलाद प्रकल्पात कोणत्याही प्रकारचा प्राणघातक अपघात घडू दिला नाही. त्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.रांचीत पार पडलेल्या एका समारंभात कंपनीचे कार्यकारी संचालक (कार्य) आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख एम. एम. पंडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पोलाद उद्योगातील सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण विषयक संयुक्त समितीने या पुरस्कारासाठी नीलाचलची निवड केली. २0१६मध्ये कोणत्याही प्रकारचा अपघात घडू न देता सुरक्षितपणे काम पार पाडल्यामुळे नीलाचलची पुरस्कारासाठी निवड झाली. नीलाचल प्रकल्प कलिंगनगर औद्योगिक वसाहतीत आहे.