Join us
Daily Top 2Weekly Top 5

सपकाळ फार्मसी कॉलेजतर्फे राज्यस्तरिय परिसंवाद

By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रवींद्र गंभीरराव सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी, अंजनेरी, नाशिक येथे राज्यस्तरिय परिसंवादास प्रारंभ करण्यात आला आहे.

नाशिक : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रवींद्र गंभीरराव सपकाळ कॉलेज ऑफ फार्मसी, अंजनेरी, नाशिक येथे राज्यस्तरिय परिसंवादास प्रारंभ करण्यात आला आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदवी धारण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजकता निर्माण व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन व चालना मिळून स्वत:चा व्यवसाय ते कारखानदारीपर्यंत प्रगती कशी करावी या संबंधीचे मार्गदर्शन मिळणार आहे.
कार्यक्रमात औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील व अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध उद्योजक दिनेश काशीकर, क्लालिटी हेड, सिपला लि., इंदौर, अतुल सोलनकर, सुहास झांबरे, नितेश चौधरी, सुधीर बाहेती, सौ. नलिनी कुलकर्णी, संचालक अमोल इंडस्ट्रिज, नाशिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्टेज डेयरिंग व उद्योगधंद्यात चांगले संभाषण करण्याकरिता किरण मोहिते, संचालक, मुक्तांगण यांचे लेˆर आयोजित केले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)