Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या रुंग्टा ग्रुपला राज्यस्तरीय पुरस्कार

By admin | Updated: October 25, 2016 23:16 IST

नाशिक : येथील बांधकाम व्यवसायातील अग्रणी असलेल्या रुंग्टा गु्रपला राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. या समूहाने परवडणारी घरे तयार केल्याबद्दल हा बहुमान देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ललित रुंग्टा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नाशिक : येथील बांधकाम व्यवसायातील अग्रणी असलेल्या रुंग्टा गु्रपला राज्य शासनाच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. या समूहाने परवडणारी घरे तयार केल्याबद्दल हा बहुमान देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समूहाचे व्यवस्थापकीय संचालक ललित रुंग्टा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.राज्य शासनाच्या वतीने विविध गटात आयोजित स्पर्धेत अफॉर्डेबल होम विथ बेस्ट ॲमेनिटीज ऑफ द इयर या गटात अनेकांना मागे टाकत रुंग्टा ग्रुपने बाजी मारली. मुंबईत एका शानदार सोहळ्यात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, तसेच रुंग्टा ग्रुपचे निखिल रुंग्टा, अखिल रुंग्टा, सागर काबरे, महेंद्र एकबोटे, रमेश गुप्ता, अंकित गुप्ता, विजय पाटील आदि उपस्थित होते. छायाचित्र क्रमांक- २५पीएचओटी ०५- राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा परवडणारी घरे गटातील पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारताना ललित रुंग्टा.