Join us  

स्टेट बँक ६,५४७ कोटींनी तोट्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 7:43 PM

देशात सर्वाधिक शाखा असलेल्या सरकारी स्टेट बँक आॅफ इंडियाला ६,४५७ कोटी रुपयांचा वार्षिक तोटा झाला आहे. मागील वर्षीही बँकेला १८०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

मुंबई  - देशात सर्वाधिक शाखा असलेल्या सरकारी स्टेट बँक आॅफ इंडियाला ६,४५७ कोटी रुपयांचा वार्षिक तोटा झाला आहे. मागील वर्षीही बँकेला १८०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पण स्थापनेपासूनचा हा सर्वाधिक तोटा आहे. या आर्थिक वर्षात बँकेच्या बुडित कर्जात (एनपीए) १३,८७७ कोटी रुपयांची वाढ होऊन ते १.१० लाख कोटी रुपये झाले. बुडित कर्जांपोटी बँकेला ४,७४२ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागली. कर्जबुडव्यांमुळे एकूण ६६,०५८ कोटी रुपयांची तरतूद करावी लागल्याने देशातील प्रतिष्ठेची बँक भीषण तोट्यात गेली आहे. बँकेचा नक्त एनपीए ५.१९ वरुन ५.७३ टक्क्यांवर गेला आहे. बँकेला २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित तब्बल ७,७१८ कोटी रुपयांचा तोटा झाला.

टॅग्स :एसबीआयव्यवसायबातम्या