Join us  

तुमचं SBI मध्ये खातं आहे? मग सावध व्हा...बँकेनं दिला महत्वाचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 6:29 PM

जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल आणि तुम्हाला बँकेच्या नावानं अनेक बनावट कॉल येत असतील तर तुम्ही त्याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे.

जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल आणि तुम्हाला बँकेच्या नावानं अनेक बनावट कॉल येत असतील तर तुम्ही त्याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांना बनावट कॉल्सबाबत अलर्ट जारी केला आहे. एसबीआयनं आपल्या ग्राहकांना फेक नंबरवरुन पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये असं सांगितलं आहे. 

जर तुम्हाला इतर कोणत्याही नंबरवरून कॉल आला आणि तुम्हाला केवायसी अपडेट करण्यास सांगितलं गेलं, तर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतीही माहिती देण्याची गरज नाही. अन्यथा तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. 

SBI ग्राहकांनी अशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि बँकेनं आपल्या ग्राहकांना फोन उचलू नये आणि KYC अप डेट लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन केलं आहे. बँकेनं केवळ कॉलवरच नव्हे तर एसएमएस, ईमेल इत्यादींवरील अशा लिंक्सपासून सावध राहण्यास सांगितलं आहे. तुमची जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही आणि ओटीपी यांसारखे क्रमांक कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय एसबीआय, आरबीआय, सरकार, कार्यालय, पोलीस आणि केवायसी प्राधिकरणाच्या नावानं फोन कॉल करताना नेहमी सावधगिरी बाळगावी.

फोनवरील कोणतेही अॅप किंवा तुमच्या फोनवरील कोणत्याही अज्ञात स्रोताद्वारे कोणतेही अॅप डाउनलोड करू नका. अनोळखी लोकांनी पाठवलेल्या मेल्स आणि मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तुम्हाला सोशल मीडिया किंवा मेसेज आणि फोनवर मिळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बनावट ऑफरपासून सावध राहावं. तुमचा बँक खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांक ठेवल्यास किंवा त्याचे छायाचित्र काढल्यानेही तुमची माहिती लीक होण्याचा धोका असतो, त्यामुळे याचीही काळजी घेणं आवश्यक आहे.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडिया