Join us  

SBIनं बंद केली ही सुविधा, आता पैसे काढण्यास येणार अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 3:05 PM

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आणखी एक सुविधा बंद केली आहे.

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आणखी एक सुविधा बंद केली आहे. तुमचं एसबीआयमध्ये खातं असल्यास तुम्हालाही ही सुविधा बंद झाल्यानंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण 12 डिसेंबरपासून एसबीआय जुना धनादेश स्वीकार करणार नाही. तुमचं जुनं चेकबुक त्यामुळे कालबाह्य होणार आहे.जुनं चेकबुक बँकेत जमा करून नवीन चेकबुक घेण्यासाठी एसबीआयनं ग्राहकांना मेसेजही पाठवले आहेत. जेणेकरून जुने चेकबुक स्वीकार केले जाणार नाहीत. स्टेट बँक ऑफ इंडियानं आरबीआयच्या निर्देशानुसार याची अंमलबजावणी केली आहे. आरबीआयनं तीन महिन्यांपूर्वीच बँकेला निर्देश देत सांगितलं होतं की, 1 जानेवारी 2019पासून नॉन सीटीएस चेकबुकचा वापर पूर्णतः बंद करण्यात आला पाहिजे. आरबीआयच्या निर्देशांचं पालन करतच एसबीआयनं जुने चेकबुक परत मागवले आहेत.बँक स्वतःच्या ग्राहकांचं जुनं चेकबुक जमा करून घेऊन त्यांना नवीन चेकबुक देणार आहे. नॉन सीटीएस चेकबुक बंद करण्याची डेडलाइन 31 डिसेंबर 2018 ठरवून देण्यात आली असली तरी एसबीआयनं ग्राहकांना 12 डिसेंबरपासून जुने चेक स्वीकार करणार नसल्याचं मेसेजच्या माध्यमातून सांगितलं आहे. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक आहात, तर लागलीच नवं चेकबुक बँकेत जाऊन घ्यावे.CTS चेकमध्ये मिळणार चांगल्या सुविधासीटीएस चेक वटण्यास जास्त वेळ लागत नाही. या यंत्रणेत चेक एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घेऊन जावे लागत नाही. चेक वटवण्यासाठी तुम्हाला फक्त इलेक्ट्रॉनिक कॉपी दाखवावी लागते. या यंत्रणेत ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरविल्या जातात.  

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाभारतीय रिझर्व्ह बँक