Join us  

SBIचा ग्राहकांना मोठा धक्का! FDवरील व्याज केले कमी, जाणून घ्या नवीन दर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 2:36 PM

पारंपरिक, सुरक्षित आणि निश्चित व्याज उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी(FD)मध्ये गुंतवणूक केली जाते.

देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्थिर ग्राहकांवर (FD) व्याज दर कमी केल्याने पुन्हा एकदा ग्राहकांना धक्का बसला. एसबीआयने 2 वर्षांहून कमी कालावधीच्या किरकोळ देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याज 1-2 वर्षांच्या कालावधीत 0.20 टक्क्यांनी कमी केले आहे. म्हणजेच आता एसबीआयच्या एफडीचा फायदा कमी झाला आहे. 10 सप्टेंबर 2020 पासून नवीन व्याजदर लागू झाले आहेत. यापूर्वी एसबीआयने 27 मे रोजी मुदत ठेवींचे व्याजदर कमी केले होते. पारंपरिक, सुरक्षित आणि निश्चित व्याज उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी(FD)मध्ये गुंतवणूक केली जाते.एसबीआयच्या एफडीसाठी नवीन (10 सप्टेंबरपासून लागू) व्याज दर>> 7 ते 45 दिवस: नवीन व्याजदर 2.90 टक्के>> 46 ते 179 दिवस: नवीन व्याजदर 3.90 टक्के>> 180 ते 210 दिवस: नवीन व्याजदर 4.40 टक्के>> 211 दिवस ते 1 वर्षासाठी: नवीन व्याजदर 4.40 टक्के

>> 1 ते 2 वर्षे: नवीन व्याजदर 4.90 टक्के>> 2 ते 3 वर्षे: नवीन व्याजदर 5.10 टक्के>> 3 ते 5 वर्षे: नवीन व्याजदर 5.30 टक्के>> 5 ते 10 वर्षे: नवीन व्याजदर 5.40 टक्के

एसबीआय ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी व्याजदरः>> 7 ते 45 दिवस: नवीन व्याजदर 3.40>> 46 ते 179 दिवस: नवीन व्याजदर 4.40 टक्के>> 180 ते 210 दिवस: नवीन व्याजदर 4.90 टक्के>> 211 दिवस ते 1 वर्षासाठी: नवीन व्याजदर 4.90 टक्के>> 1 ते 2 वर्षे: नवीन व्याजदर 5.40 टक्के>> 2 ते 3 वर्षे: नवीन व्याजदर 5.60 टक्के>> 3 ते 5 वर्षे: नवीन व्याजदर 5.80 टक्के>> 5 ते 10 वर्षे: नवीन व्याजदर 6.20 टक्केयापूर्वी बँकेने एमसीएलआर-मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित कर्ज दर(MCLR-Marginal Cost of Funds based Lending Rate), कर्जाचा मुख्य दर या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. एसबीआयने एमसीएलआर रिसेट वारंवारता 1 वर्षापासून सहा महिन्यांपर्यंत कमी केली आहे. घसरलेल्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी कर्जदारांना वर्षासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. सध्या एसबीआयचा एक वर्षाचा एमसीएलआर 7 टक्के आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर 6.95 टक्के आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी प्रोडक्टयाशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेने एफडी प्रोडक्ट 'एसबीआय व्हेकेअर डिपॉझिट' सुरू केले आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ मुदत ठेवींवर 5 वर्षांच्या मुदतीसाठी 30 बेसिस पॉईंटचा अतिरिक्त प्रीमियम मिळेल. एसबीआय व्हीकर डिपॉझिट योजना 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू राहील.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडिया