Join us
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींमध्ये राबविणार अत्याधुनिक ‘पेमेंट गेट वे’ प्रणाली!

By admin | Updated: April 20, 2016 03:13 IST

बड्या कंपन्या, आॅनलाईन खरेदी- विक्री व्यवहार तसेच मॉलमधील ‘पेमेंट गेट वे’ संकल्पना नगर जिल्ह्यातील पाच मोठ्या ग्रामपंचायतीत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय जिल्हा

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगरबड्या कंपन्या, आॅनलाईन खरेदी- विक्री व्यवहार तसेच मॉलमधील ‘पेमेंट गेट वे’ संकल्पना नगर जिल्ह्यातील पाच मोठ्या ग्रामपंचायतीत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने घेतला आहे. त्यासाठी एचडीएफसी बँकेने विनामूल्य सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.‘पेमेंट गेट वे’ प्रणालीमुळे ग्रामस्थांसह, ग्रामसेवक आणि प्रशासन सर्वांचा आर्थिक ताण कमी होऊन व्यवहारात पारदर्शकता येईल.जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित केले असून पंचायतीचा निधी, विनियोग, जमा होणारा कर, दैनंदिन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार, केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारे कोट्यवधी रुपयांचे अनुदान या सर्व आर्थिक व्यवहारात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याचे ठरविले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या संक ल्पनेतून ‘आपलं गाव,आपला विकास’ ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यात १४ व्या वित्त आयोगातून येणारा निधी खर्च करण्यासाठी संबंधीत गावाने आधी विकास आराखडा तयार करणे सक्तीचे आहे. प्रत्येक पंचायत समिती गणात १५० प्रवीण प्रशिक्षक नेमण्यात येणार आहेत. पुढील भाग म्हणून ग्रामपंचायतींच्या व्यवहाराला आता ‘पेमेंट गेट वे’ची जोड देण्यात येणार आहे. ‘पेमेंट गेट वे’चे एक खाते सुरू करण्यासाठी साधारण ५० ते ७५ हजार खर्च अपेक्षित आहे. मात्र जिल्हा परिषदेला विनामूल्य हे खाते सुरू करता येणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के आणि बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.