Join us

स्मार्ट शहरांसाठी राज्य व स्थानिक संस्थांची भूमिका महत्त्वाची -नायडू

By admin | Updated: January 31, 2015 02:17 IST

सरकारने आज पुन्हा एकदा जोर देऊन सांगितले की, स्मार्ट सिटी प्रकल्पात राज्ये व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांची भूमिका महत्त्वाची आहे

नवी दिल्ली : सरकारने आज पुन्हा एकदा जोर देऊन सांगितले की, स्मार्ट सिटी प्रकल्पात राज्ये व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांची भूमिका महत्त्वाची आहे. यंदा हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी अर्थात पीपीपी मॉडेलद्वारे टप्प्या-टप्प्याने सादर केला जाणार आहे.राज्ये व अंशधारकांच्या स्मार्ट सिटीवर अंतिम सल्लामसलत कार्यशाळेला संबोधित करताना शहरी विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी आज केंद्र सरकार स्मार्ट शहर उभारून ते राज्यांकडे हस्तांतरित करेल, ही धारणा दूर करण्याचा प्रयत्न केला.नायडू म्हणाले, राज्ये व अन्य भागधारकांना शहरी जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय योजावे लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यांना सोबत घेऊन स्मार्ट शहरे उभारण्याची इच्छा आहे. आम्हाला टीम इंडियाच्या धर्तीवर काम करावे लागेल. यामुळेच मी आव्हाने, समस्या व उपलब्ध संधी याबाबत थेट बोलत आहे. अनेक देश व कंपन्या या योजनेत भागीदारीसाठी पुढे येत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाची पीपीपी मॉडेलच्या मदतीने उभारणी केली जाणार आहे. केंद्र सरकार या प्रकल्पासाठी शहरांची निवड करण्याकरिता राज्यांशी विचारविमर्श करेल. याचे व्यापक मानदंड निश्चित करण्यात आले असून दिशानिर्देश जारी केले आहेत. याला अंतिम रूप देण्यापूर्वी राज्यांना विश्वासात घेतले जाईल, अशी ग्वाहीही नायडू यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)