Join us  

छोट्या गॅरेजमधून केली सुरुवात, आज अब्जावधींचे साम्राज्य; शिव नाडरांचा जबरदस्त प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 4:16 PM

शिव नाडर हे देशातील दानशुर उद्योगपती आहेत.

आपल्या देशात अनेक मोठे उद्योगपती आहेत. या काही उद्योगपतींची सुरुवात मोठ्या कष्टातून आहेत. यात पहिलं नाव येत ते म्हणजे उद्योगपती शिव नाडर यांचे. त्यांचा भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींमध्ये तसेच महान दानशूर व्यक्तींमध्ये समावेश आहे. १४ जुलै १९४५ रोजी जन्मलेले शिव नाडर हे सध्या हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड (HCL) ग्रुपचे मानद अध्यक्ष आहेत. नाडर यांनी १९७६ मध्ये एचसीएल ग्रुपची स्थापना केली होती. स्वदेशी संगणक तयार करणारी एचसीएल ही भारतातील पहिली कंपनी आहे. शिव नाडर यांना त्यांच्या सामाजिक योगदानासाठी २००८ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

१ सप्टेंबरपासून होणार 'हे' १० मोठे बदल, वाचा; दुर्लक्ष केल्यास आर्थिक फटका बसेल

शिव नाडर यांनी १९७६ मध्ये त्यांच्या पाच मित्रांसह गॅरेजमध्ये कॅल्क्युलेटर आणि मायक्रोप्रोसेसर तयार करण्यासाठी हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड (HCL) ची स्थापना केली. आज HCL ची कमाई १२.८ अब्ज रुपये आहे आणि ती भारतातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. कंपनी जगातील ६० देशांमध्ये २,२५,००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार देते.

या सर्वांशिवाय शिव नाडर हे भारतातील सर्वात मोठे परोपकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. शिव नाडर यांनी त्यांच्या 'शिव नादर फाऊंडेशन'ला १.१ अब्ज डॉलर देणगी दिली जे शिक्षण क्षेत्रात काम करते. या फाउंडेशनचा थेट फायदा ३६,००० मुलांना होतो. फोर्ब्स इंडियानुसार, शिव नाडर हे भारतातील ५५ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. शिव नाडर यांची एकूण संपत्ती २७.४ अब्ज डॉलर एवढी आहे.

शिव नाडर यांचा जन्म तमिळनाडूतील तिरुचेंदूर येथे झाला. शिव नाडर एका साध्या कुटुंबात वाढले. त्यांनी कुंभकोणम येथील टाऊन हायर सेकेंडरी स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. शिव नाडर यांनी नंतर चेन्नईच्या लोयोला कॉलेजमधून प्री-युनिव्हर्सिटी पदवी घेतली. सुरुवातीपासूनच त्यांचा कल गणित आणि इलेक्ट्रॉनिक्सकडे होता. नाडर यांनी पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, कोईम्बतूर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पूर्ण केले.

टॅग्स :शिव नाडरव्यवसाय