श्रीगोंदा : घोडमध्ये पाणी सोडण्यासाठी आजी माजी आमदारांची पत्रकबाजी
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
श्रीगोंदा : घोड धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. पाऊस लांबल्याने लाभक्षेत्रातील पिके जळून चालली आहेत. पिकांना जीवदान देण्यासाठी डिंबेतून घोड धरणात दोन टीएमसी पाणी सोडावे यासाठी श्रीगोंद्याच्या आजी माजी आमदारांनी मंत्र्यांच्या भेटी घेऊन पत्रकबाजी केली आहे.
श्रीगोंदा : घोडमध्ये पाणी सोडण्यासाठी आजी माजी आमदारांची पत्रकबाजी
श्रीगोंदा : घोड धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. पाऊस लांबल्याने लाभक्षेत्रातील पिके जळून चालली आहेत. पिकांना जीवदान देण्यासाठी डिंबेतून घोड धरणात दोन टीएमसी पाणी सोडावे यासाठी श्रीगोंद्याच्या आजी माजी आमदारांनी मंत्र्यांच्या भेटी घेऊन पत्रकबाजी केली आहे.आ. राहुल जगताप व युवा नेते दीपक नागवडे यांनी पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेऊन डिंबेतून घोड धरणात दोन टीएमसी पाणी सोडावे अशी मागणी केली. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले असून डिंबेमधून घोड धरणात दीड टीएमसी पाणी सोडावे असे नमूद केले आहे. २० ऑगस्ट रोजी पाचपुते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. सध्या कुकडीचे पिकासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. आता नेत्यांनी कुकडीकडून घोडच्या आवर्तनाकडे मोर्चा वळविला आहे. डिंबे धरणात सध्या ६ टीएमसी पाणी आहे. डिंबेतून घोड धरणात पाणी सोडण्यासाठी माजी आ. बबनराव पाचपुते आ. जगताप यांनी भूमिका स्पष्ट केली.