Join us

स्वस्ताईचा शिडकावा!

By admin | Updated: January 17, 2015 06:11 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या भावात प्रति लीटर २ रुपये ४२ पैसे तर डिझेलच्या भावात प्रति लीटर २ रुपये २५ पैशांची कपात केली आहे.

मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या भावात प्रति लीटर २ रुपये ४२ पैसे तर डिझेलच्या भावात प्रति लीटर २ रुपये २५ पैशांची कपात केली आहे. स्थानिक कर आणि दर वगळता ही कपात असल्याने विभागनिहाय प्रत्यक्षातील कपात ही ४० ते ६० पैसे अधिक असेल. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. एकीकडे ही दरकपात करतानाच या दोन्ही इंधनांवरील उत्पादन शुल्कात सरकारने २ रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, उत्पादन शुल्कात झालेली वाढ ही ग्राहकांच्या खिशातून वसूल होणार नाही. त्यामुळे याचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार आहे.कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीने सहा वर्षांचा नीचांक गाठत प्रति बॅरल ४५ अमेरिकी डॉलरची पातळी गाठली आहे. गेल्या सहा महिन्यांत हे दर प्रति बॅरल ८० अमेरिकी डॉलरवरून निम्म्या किमतीच्या आसपास कमी झाले आहेत. त्यातच पेट्रोलपाठोपाठ डिझेलचे दरही नियंत्रणमुक्त केल्याने हे दर आता थेट बाजाराशी निगडित झाले आहेत. तेल कंपन्यांच्या आज, शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)