Join us

स्पाईसजेटची लो बजेट हवाई सफर

By admin | Updated: July 6, 2015 17:34 IST

स्पाईसजेट या विमान कंपनीने प्रवाशांसाठी कमी बजेटमध्ये ठराविक काळापुरती देशांतर्गत हवाई सफर करण्यासाठी ऑफर सुरु केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, ०६ - स्पाईसजेट या विमान कंपनीने प्रवाशांसाठी कमी बजेटमध्ये ठराविक काळापुरती देशांतर्गत हवाई सफर करण्यासाठी  ऑफर सुरु केली आहे. यामध्ये काही मोजक्याच शहरात प्रवाशांना फक्त १८९९ रुपयांत हवाई सफर करता येणार आहे. 
स्पाईसजेटने 'रेड हॉट फेअर्स' अशी एक सेल ऑफर सुरु केली आहे. मुंबई - गोवा, अहमदाबाद - मुंबई, बंगळुरु - हैदराबाद, चेन्नई - बंगळुरु, पुणे - बंगळुरु या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी फक्त १८९९ रुपयांची ही ऑफर आहे.
मात्र ही ऑफर तीन दिवसांपूर्ती मर्यादित असून आज मध्यरात्रीपासून ते ८ जुलैपर्यंत उपलब्ध असणार आहे. या कालावधीत प्रवासांनी बुकिंग केल्यास त्यांना १५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रवास करता येणार आहे.
तसेच, या ऑफरची तिकीट बुकिंग स्पाईसजेटच्या संकेतस्थळावर, ऑनलाइन ट्रॅव्हलच्या पोर्टल आणि ट्रॅव्हल एजन्टसकडे करता येणार आहे.