Join us
Daily Top 2Weekly Top 5

'स्पाइस जेट'ची स्पेशल ऑफर, केवळ 888 रूपयांत विमान प्रवास

By admin | Updated: October 4, 2016 15:19 IST

सण-उत्सवाच्या काळात विमान सेवा देणा-या कंपन्यांमध्ये दोन वर्षांपासून चांगलीच स्पर्धा पाहायला मिळते. यंदा देखील स्पाइस जेट ही खासगी विमानसेवा देणारी कंपनी धमाकेदार ऑफर

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - सण-उत्सवाच्या काळात विमान सेवा देणा-या कंपन्यांमध्ये दोन वर्षांपासून चांगलीच स्पर्धा पाहायला मिळते. यंदा देखील स्पाइस जेट ही खासगी विमानसेवा देणारी कंपनी धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. यानुसार  केवळ 888 रूपयांमध्ये देशांतर्गत (डोमेस्टिक) प्रवास करता येणार आहे. 

ठरावीक कालावधीसाठी ही ऑफर असणार आहे. 4 ऑक्टोबर म्हणजे आजपासून ते 7 ऑक्टोबरपर्यंत यासाठी तिकीट बूक करावे लागणार, तर 8 नोव्हेंबर ते 13 एप्रिलपर्यंत या तिकीटांवर प्रवास करता येणार आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 3 हजार 699रूपये मोजावे लागणार आहेत.
 
देशांतर्गत प्रवासामध्ये बंगळुरु-कोच्ची, दिल्ली-डेहरादून, चेन्नई-बंगळुरु आदी ठिकाणचा प्रवास करता येणार आहे.