Join us

लघु उद्योगातील वित्त साहाय्य, व्यवस्थापन, नियोजनासंदर्भात होणार विशेष परिषद

By admin | Updated: July 19, 2015 23:13 IST

लघु उद्योगातील वित्त साहाय्य, वित्त व्यवस्थापन आणि या संदर्भातील विविध घडामोडींचा वेध घेण्यासाठी एसएमई चेंबर आॅफ इंडियातर्फे येत्या २४ जुलै रोजी

मुंबई : लघु उद्योगातील वित्त साहाय्य, वित्त व्यवस्थापन आणि या संदर्भातील विविध घडामोडींचा वेध घेण्यासाठी एसएमई चेंबर आॅफ इंडियातर्फे येत्या २४ जुलै रोजी एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषदेच्या सहायाने घेण्यात येणाऱ्या या परिषदेच्या निमित्ताने प्रामुख्याने, लघु व मध्यम उद्योजकांना भारतीय बँक, एनबीएफसी, प्रायव्हेट इक्विटी, व्हेन्चर कॅपिटल, तसेच या क्षेत्रातील उद्योजकांचा परदेशी गुंतवणूकदारांशी थेट संवाद घडविणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे. लघु उद्योगक मंत्रालयाचे सचिव डॉ. अनुप पुजारी यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. वित्तीय वर्तुळातील अनेक दिग्गज या परिषदेत सहभागी होणार असून उपस्थितांना अनुभवकथन व मार्गदर्शन करणार आहेत. राज्य व देशभरातून सुमारे ६०० उद्योगक या परिषदेत सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)