Join us

गुंतवणूक कर संरक्षणाच्या अभ्यासासाठी विशेष समिती

By admin | Updated: August 26, 2014 00:51 IST

फिक्सड् तसेच भांडवली बाजारातील गुंतवणुकीची विविध साधनांना करातून किती व कशी सूट देता येईल व ही उत्पादने किती आकर्षक करता येतील

मुंबई : फिक्सड् तसेच भांडवली बाजारातील गुंतवणुकीची विविध साधनांना करातून किती व कशी सूट देता येईल व ही उत्पादने किती आकर्षक करता येतील, याची चाचपणी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या संदर्भात एका अभ्यासगटाची स्थापना केली आहे. आगामी तीन महिन्यांत या अभ्यासगटाने बँकेला अहवाल सादर करणे अपेक्षित असून, या अहवालाच्या आधारे विद्यमान गुंतवणुकीच्या साधनांच्या रचनेत किंवा नव्या साधनांच्या निर्मितीचा विचार होणार आहे.लोकसंख्येच्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत फिक्सड् आणि भांडवली बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा दर वाढविण्याची गरज वेळोवेळी प्रत्येक सरकारमधील अर्थमंत्र्यांनी बोलून दाखविली आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योजनांच्या स्वरूपाकडे लक्ष देतानाच जर अधिक मजबुतीने कर संरक्षण कसे देता येईल, याचा विचार या अभ्यासगटामार्फत होणार आहे. (प्रतिनिधी)