मुंबई : स्थानिक बाजारात गुरुवारी शेअर्सची मर्यादित खरेदी-विक्री झाली. मुंबई शेअर बाजारात निर्देशांक ११.५९ अंकांंनी घसरून २५,८३८ वर बंद झाला. रिझर्व्ह बँकेच्या एका ताज्या अहवालात वसुली नसल्यामुळे फसून बसलेल्या कर्जाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात ही किंचित घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. शेअर बाजारात सुरुवातीला निर्देशांक २५,९२२ पर्यंत पोहोचला होता; पण गुंतवणूकदारांनी सतर्क राहण्याची भूमिका घेत शेअर्सची विक्री केली. त्यामुळे सेन्सेक्स घसरला आणि अखेर ११.५९ अंकांंनी घसरून तो २५,८३८ वर बंद झाला. सेन्सेक्स बुधवारी २५९ अंंकांनी मजबूत झाला होता, हे विशेष.
सेन्सेक्समध्ये किंचित घसरण
By admin | Updated: December 25, 2015 01:22 IST