मुंबई : एसबीआय, युनियन बँक आणि आयडीबीआय बँकेनंतर आणखी काही बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. नोटाबंदीमुळे बँकांकडे रोख रकमेचे भांडार आले आहे. लोकांना कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बँका व्याजदरात कपात करीत आहेत.खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने कर्जाचा व्याजदर 0.४५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. कोशाच्या कमाल खर्चावर (एमसीएलआर) आधारित कर्जाचा व्याजदर 0.२0 टक्के ते 0.४५ टक्के इतका कमी करण्यात आला आहे. एक वर्षाच्या एमसीएलआरसाठी 0.२0 टक्के, तर एक महिना आणि तीन महिने यासाठी 0.४५ टक्के करण्यात आला आहे. एक वर्षाचा एमसीएलआर आता ९ टक्के व्याजदर असेल. एक महिन्यासाठी ८.२५ टक्के, तर तीन महिन्यांसाठी ८.४0 टक्के राहील, असे कोटक महिंद्राने निवेदनात म्हटले आहे.सरकारी बँक असलेल्या देना बँकेने कर्जाच्या मानक दरात 0.७५ टक्क्यांची कपात केली आहे. एक वर्षाच्या एमसीएलआरवर आधारित कर्जाचा दर आता ८.५५ टक्के झाला आहे. घर, कार आणि अन्य कर्जांना त्याचा लाभ मिळेल. बंधन बँकेने व्याजदरात १.४८ टक्क्यांची कपात केली आहे. त्याबरोबर बँकेचा एमसीएलआरवर आधारित व्याजदर १0.५२ टक्के झाला आहे.
आणखी काही बँकांनी व्याजदरांत केली कपात
By admin | Updated: January 3, 2017 03:03 IST