ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - डिझेलचे दर ठरवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बाजारावर सोपवावा असे मत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. सध्या डिझेलच्या दरांचे नियंत्रण हे सरकारच्या निर्णयानुसार होत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असून डिझेलच्या दरांवरील नियंत्रणही सरकारने हटवावे असे राजन यांनी म्हटले आहे. सोमवारी तेल कंपन्यांची बैठक होणार असून त्याबैठकीत डिझेलचे दर ५० पैशांनी तर पेट्रोलचे दर हे १ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यताही राजन यांनी वर्तवली आहे. डिझेलचे दर कमी झाल्यास सात वर्षांत पहिल्यांदा हे दर कमी होणार असतील. पेट्रोलचे दर आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या ठरवतात, परंतू डिझेलचे दर हे पुर्णतः सरकारी नियंत्रणात आहेत.