Join us  

आतापर्यंत १.४६ कोटी प्राप्तिकर विवरणे दाखल, ९०.८ लाख करदात्यांनी भरला आयटीआर-१

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 4:37 AM

२०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत १.४६ कोटींपेक्षा अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत १.४६ कोटींपेक्षा अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. यातील ९०.८ लाख विवरणपत्रे वार्षिक ५० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची आहेत. महसूल विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १६ जुलै या एकाच दिवशी ७.९४ लाख विवरणपत्रे भरण्यात आली. यातील ५.२६ लाख आयटीआर-१ होती.आयटीआर-१ अर्ज देशात राहणारे असे लोक भरतात ज्यांचे वेतन, एक घर, संपत्ती व अन्य स्रोत (व्याज) यापासून एकूण उत्पन्न ५० लाख रुपये व कृषी उत्पन्न ५,००० रुपये आहे. यात संचालक ंिकंवा सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे करदाते नाहीत.याशिवाय १६ जुलैपर्यंत ९.६८ लाख आयटीआर-२ व १४.९४ लाख आयटीआर-३ अर्ज भरले गेले आहेत.>सुविधेमुळे संख्येत वाढअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुविधेमुळे विवरणपत्र दाखल करणाºयांची संख्या वाढली आहे. याचे मुख्य कारण आधीपासून भरलेले विवरणपत्र आहे. कारण त्यात सुधारणा केली जाऊ शकते. प्राप्तिकर खात्याने दिलेल्या माहितीनुसार, २८ लाखआयटीआर-४ किंवा सुगम अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत २४,००० कंपन्यांनी आयटीआर-६ अर्ज भरलेला आहे. १६ जुलैपर्यंत एकूण १.४६ कोटी विवरणपत्रे भरण्यात आलेलीआहेत.