Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्नॅपडील-फ्लिपकार्ट विलीनीकरण करार पुढील आठवड्यात

By admin | Updated: May 11, 2017 01:07 IST

संकटात सापडलेली ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलचे फ्लिपकार्टमध्ये विलीनीकरण करण्यासंबंधीच्या करारावर पुढील आठवड्यात स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संकटात सापडलेली ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलचे फ्लिपकार्टमध्ये विलीनीकरण करण्यासंबंधीच्या करारावर पुढील आठवड्यात स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, करार झाल्यानंतर स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल आणि रोहित बन्सल हे कंपनीतून बाहेर पडणार आहेत. स्नॅपडीलची डिजिटल पेमेंट उपकंपनी फ्रीचार्ज आणि जुनी व्यवस्थापन पुरवठादार कंपनी युनिकॉमर्स यांचाही करारात समावेश असणार आहे. कंपनीची लॉजिस्टिक शाखा व्हलकॅन एक्स्प्रेसला मात्र करारातून वगळण्यात येणार असल्याचे समजते