Join us

्रपान १ - शरद पवारांनी दगा दिला

By admin | Updated: August 23, 2014 22:02 IST

शरद पवारांनी दगा दिला

शरद पवारांनी दगा दिला
- सूर्यकांता पाटील यांचा आरोप
नांदेड : एखाद्या व्यक्तीला वडील मानावं अन् वडीलानेच दगा द्यावा हे फार क्लेशदायक आहे़ शरद पवार हे राजकारणात माझे भावविश्व आहे़ राजकारणाचा धंदा झाला नव्हता त्या काळात मी त्यांच्यासाठी काम करीत होते़ परंतु शेवटच्या क्षणी मला बाजुला करुन माझा विश्वासघात करण्यात आल्याची खंत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज पत्रकारांजवळ व्यक्त केली़
तीन वेळा खासदार, एक वेळ आमदार राहिले असताना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून माझे तिकीट कापण्यात आले़, असे सांगून माजी खा. पाटील म्हणाल्या, विधानपरिषदेसाठी यादीत नाव असताना शेवटच्या क्षणी मला डावलण्यात आले़ त्यावेळी शरद पवार यांनी मला सात दिवस अगोदरच वेळ दवडू नको कामाला लाग असे सांगितले होते़ परंतु काम सुरु कर म्हणणारा नेताच पुन्हा काम बंद कर म्हणून कसा काय म्हणू शकतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)
(सविस्तर वाचा सुपर व्होट पानावर)