Join us

स्मार्टफोनच्या विक्रीत ४४ टक्क्यांची वाढ

By admin | Updated: August 12, 2015 02:10 IST

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सुस्तावलेली स्मार्टफोनची विक्री दुसऱ्या तिमाहीत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढून २.६५ कोटींवर पोहोचली. संशोधन संस्था आयडीसीने म्हटले आहे

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सुस्तावलेली स्मार्टफोनची विक्री दुसऱ्या तिमाहीत तब्बल ४४ टक्क्यांनी वाढून २.६५ कोटींवर पोहोचली. संशोधन संस्था आयडीसीने म्हटले आहे की जूनअखेरच्या तिमाहीमध्ये कंपन्यांनी विक्री वाढविण्यासाठी आॅनलाईनचे माध्यम वापरले.आयडीसीच्या माहितीनुसार वर्ष २०१७ मध्ये भारत अमेरिकेच्या पुढे जाण्याची व जगात दुसरी सगळ्यात मोठी स्मार्टफोनची बाजारपेठ बनण्याची आशा आहे. २०१४ च्या जूनअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये १.८४ कोटी स्मार्टफोन विकले गेले होते.