Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोनची बाजारपेठ चार टक्क्यांनी घटली

By admin | Updated: February 25, 2015 00:25 IST

देशातील स्मार्ट फोनच्या बाजारपेठेतील उलाढाल गेल्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत गेल्या वर्षी याच तीन महिन्यांतील उलाढालीच्या तुलनेत

नवी दिल्ली : देशातील स्मार्ट फोनच्या बाजारपेठेतील उलाढाल गेल्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत गेल्या वर्षी याच तीन महिन्यांतील उलाढालीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घटली. भारतातील स्मार्ट फोनची बाजारपेठ जगात सर्वाधिक गतीने वाढणारी आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशनने (आयडीसी) दिलेल्या माहितीनुसार २०१४ च्या शेवटच्या तीन महिन्यांत एकूण ६.४३ कोटी स्मार्ट फोन विकले गेले होते जे तिसऱ्या तिमाहीतील विक्रीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी कमी आहेत. स्मार्टफोनच्या वार्षिक विक्रीत पाच टक्क्यांची घट झाली आहे. २०१४ च्या आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत स्मार्ट फोनचा भरपूर साठा असल्यामुळे विक्रीत घट झाली होती, कारण त्याआधी सणांच्या दिवसांत आॅनलाईन विक्रीला भरपूर प्रतिसाद मिळाला होता. २०१४ च्या शेवटच्या तीन महिन्यांत परिस्थिती सुधारल्यामुळे विक्रीतील घट चार टक्क्यांवर आली. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत फिचर फोनच्या बाजारपेठेतील उलाढाल १४ टक्क्यांनी घटली होती. आयडीसीने २०१५ च्या पहिल्या तिमाहीतही स्मार्ट फोनची बाजारपेठ तेजीची असणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे.