Join us

छोटय़ा कंपन्यांनीच दिला अधिक परतावा

By admin | Updated: October 4, 2014 02:43 IST

शेअर बाजारातील तेजी आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे 2014 या वर्षात आतार्पयत मध्यम आणि छोटय़ा कंपन्यांनी मोठय़ा कंपन्यांच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे.

नवी दिल्ली : शेअर बाजारातील तेजी आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग यामुळे 2014 या वर्षात आतार्पयत मध्यम आणि छोटय़ा कंपन्यांनी मोठय़ा कंपन्यांच्या तुलनेत अधिक परतावा दिला आहे. मध्यम आणि छोटय़ा कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांना दिलेला परतावा तब्बल 62 टक्के आहे.
मुंबई शेअर बाजारातील तीन निर्देशांकाच्या विेषणानंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार, स्मॉल कॅप इंडेक्सने 62.44 टक्क्यांर्पयत परतावा दिला आहे. मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या स्मॉल कॅप इंडेक्सचा परतावा 41.84 टक्के आहे. 
या उलट मोठय़ा कंपन्यांच्या निर्देशांकाने दिलेल्या परताव्याचे प्रमाण फक्त 25.49 टक्के आहे. सेन्सेक्स 8 सप्टेंबर रोजी 27,319.85 अंकांवर गेला होता. 
मीड कॅप इंडेक्स 15 सप्टेंबर रोजी  10,000.84 अंकांवर पोहोचला होता. हा एक वर्षाचा उच्चंक ठरला होता. त्याच दिवशी स्मॉल कॅप इंडेक्सने 52 आठवडय़ांचा उच्चंक करून 11,245.52 टक्क्यांवर ङोप घेतली होती. 
विेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा बाजार तेजीत असतो, तेव्हा बडय़ा कंपन्यांच्या तुलनेत दुस:या आणि तिस:या दर्जाच्या कंपन्यांच्या शेअर्समधून जास्त परतावा मिळतो. मध्यम आणि छोटय़ा आकाराच्या या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना अनिश्चिततेच्या काळात मात्र थोडेसे भान ठेवणो आवश्यक ठरते. कारण अनिश्चिततेच्या काळात याच कंपन्यांना सर्वाधिक फटका बसत असतो. अनिश्चिततेच्या काळात बडय़ा कंपन्या स्थैर्य दर्शवितात. पडझड झाली तरी ती फार एका मर्यादेर्पयतच असते. तसेच अनिश्चितता संपल्यानंतर त्या पूर्ववतही होतात. 
2013 या वर्षात छोटय़ा आणि मध्यम कंपन्यांच्या समभागांची 12 टक्क्यांनी घसरण झाली होती. यंदा मात्र त्यांना अधिक लाभ मिळाला आहे. मध्यम आणि छोटय़ा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक भागीदारी किरकोळ गुंतवणूकदारांची राहिली. गेल्या काही महिन्यांपासून या क्षेत्रतील हालचाली वाढल्या आहेत. 
शेअर बाजारातील व्यावसायिकांनी सांगितले की, छोटय़ा कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी प्रामुख्याने स्थानिक गुंतवणूकदार करतात. विदेशी गुंतवणूकदार बडय़ा कंपन्यांचे शेअर्स खरेदी करतात. स्थानिक गुंतवणूकदारांचा सहभाग वाढल्यामुळे छोटय़ा कंपन्यांना लाभ झाला आहे.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4बाजारातील नोंदणीकृत ब्ल्यूचिप कंपन्यांच्या सरासरी भांडवलाचा पाचवा हिस्सा भांडवल असलेल्या कंपन्यांना मध्यम कंपन्यांच्या कक्षेत गणले जाते. मीड कॅप असा त्यांचा उल्लेख होतो. 
4ब्ल्यूचिप कंपन्यांच्या सरासरी भांडवलाच्या दहावा हिस्सा ज्यांचे भांडवल आहे, अशा कंपन्यांना छोटय़ा कंपन्या असे संबोधले जाते. स्मॉल कॅप असाही त्यांचा उल्लेख होतो. 
 
4धोका पत्करण्याची ज्यांची तयारी असते, त्यांच्यासाठी तेजीच्या काळात मध्यम आणि छोटय़ा कंपन्या गुंतवणुकीचे उत्तम साधन आहेत, असेही विेषकांनी नमूद केले. बाजारातील जाणकारांनी सांगितले की, नव्या सरकारच्या स्थापनेनंतर गुंतवणूकदारांची धारणा मजबूत झाली आहे. विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीचा ओघही वाढला आहे.