Join us  

Small Business Ideas: जबरदस्त बिझनेस! बाजारात राहील कायमची मागणी; आपणही करू शकता लोखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 4:17 PM

कुठलाही बिझनेस सुरू करताना आपल्याला सर्वप्रथम त्या बिझनेससंदर्भात पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला तो बिझनेस करणे सोपे जाते.

बरेच तरुण बिझनेस सुरू करण्याचे स्वप्न पाहत असतात. पण नेमका कोणता बिझनेस सुरू करावा, हेच अनेकांना समजत नाही. आपणही एखाद्या अशाच बिझनेसच्या शोधात आहात का, की ज्याची मागणीही कायम राहील आणि त्यातून नफाही चांगला मिळेल? तर आम्ही आपल्यासाठी एक खास बिझनेस घेऊन आलो आहोत. भाजीपाला व्यवसाय... भाज्या जवळपास सर्वांच्याच घरात येतात आणि आपणही रोजच्या आराहात भाज्यांचा वापर करतो. जिम ट्रेनर आणि डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. यामुळे लोक भाज्याखाने पसंत करतात. यामुळे याची मागणीही नेहमीच कायम राहते.

कसा करू करावा हा बिझनेस अथवा व्यवसाय? - कुठलाही बिझनेस सुरू करताना आपल्याला सर्वप्रथम त्या बिझनेससंदर्भात पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला तो बिझनेस करणे सोपे जाते. आता भाजीपाला बिझनेससाठी रोज ताज्या भाज्यांची आवश्यकता असते. यामुळे या भाज्या आपल्याला ठोक बाजारातून आणाव्या लागतात.

भाज्या कुठून विक घ्याल? - हा बिझनेस करताना आपण बादारातून भाज्या विकत घेऊन विकू शकता. तसेच जर आपण शेतकरी असाल तर, स्वतःच्या शेतात भाज्या लाऊनही आपण विकू शकता. तुम्ही कुठल्याही भाजी वाल्याकडून कमी किंमतीत भाज्या विकात घेऊन त्या विकू शकता. याशिवाय आपण कुठल्याही शेतकऱ्याशी संपर्ककरून त्याच्याकडून भाजीपाला विकत घेऊ शकता.

भाजीपाला विक्रीसाठी लायसन्स -कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला लायसन्सची आवश्यकता भासू शकते. जर आपण छोट्या प्रमाणाव बिझनेस सुरू करत असाल तर, लायसन्सची आवश्यकता भासणार नाही. पण मोठ्या प्रमाणावर बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला FSSAI लायसन्स घ्यावे लागेल.

भाजीपाला बिझनेसमधील गुंतवणूक -जर आपण एखाद्या हातगाडीवर भाजीपाला विक्री सुरू करत असाल तर, आपल्याला अधिक पैसे लागणार नाहीत. आपण हजार-पाचशे रुपयांचा भाजीपाला आणून विकू शकतात आणि हळू हळू तुमचा बिझनेस वाढवू शकता. महत्वाचे म्हणजे, हा उद्योक आपल्याला किती मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा आहे, यावर त्याला लागणारा खर्च अवलंबून आहे.

भाजीपाला उद्योगातील नफा - हा एक असा बिझनेस आहे, जो सातत्याने चालू शकतो. बाजारातही याची मागणी कायमच राहते. विशेष म्हणजे, जेव्हा भाजीपाला महाग होतो, तेव्हा बाजारातील भावही वाढतो. अशा वेळी आपण भाजीला दुप्पट किंमतीतही विकू शकता. 

टॅग्स :व्यवसायलघु उद्योगगुंतवणूक