नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ही वाढ १ जुलैपासून लागू होईल. त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना ११३ ऐवजी ११९ टक्के महागाई भत्ता मिळेल. देशभरातील ५० लाख कर्मचारी आणि ५६ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल. या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारी तिजोरीवर ११,०९२ कोटी रुपयांचा बोजा पडेल.
केंद्रीय कर्मचाऱ्याना सहा टक्के जादा ‘डीए’
By admin | Updated: September 10, 2015 04:53 IST