Join us

सिंघानिया यांच्या नातवंडांच्या याचिकेची २0 रोजी सुनावणी

By admin | Updated: April 7, 2015 01:09 IST

रेमंड लिमिटेडचे मानद चेअरमन विजयपत सिंघानिया यांच्या विरोधात त्यांच्या नातवांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने

मुंबई : रेमंड लिमिटेडचे मानद चेअरमन विजयपत सिंघानिया यांच्या विरोधात त्यांच्या नातवांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने २0 एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. सर्व प्रतिवादींना प्रतिज्ञापत्रे सादर करण्यास वेळ मिळावा यासाठी हा निर्णय न्यायालयाने दिला. विजयपत सिंघानिया यांचे थोरले पुत्र मधुपती सिंघानिया यांच्या मुलांनी ही याचिका दाखल केली आहे. अनन्या (२९), रसालिका (२६), तारिणी (२0), रैवतहरी (१८) अशी या नातवांची नावे आहेत. ३0 डिसेंबर १९९८ रोजी मधुपती आणि त्यांची पत्नी अनुराधा यांनी विजयपत सिंघानिया यांच्यासोबत एक करार करून वारसा हक्काने मिळणाऱ्या आपल्या संपत्तीवरील अधिकार सोडला होता. या कराराला आता मधुपती आणि अनुराधा यांच्या मुलांनी आव्हान दिले आहे. न्या. गौतम पटेल यांच्या न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २0 एप्रिलपर्यंत तहकूब केली.विजयपत सिंघानिया यांच्या नातवांनी याचिकेत म्हटले की, आपल्या माता-पित्यांवर दबाव टाकून करार करण्यास भाग पाडण्यात आले होते. आम्ही तेव्हा कायद्यानुसार अज्ञान होतो. आमचा पैतृक संपत्तीत नैसर्गिक हक्क असून आमच्या वतीने अन्य कोणी करार करून आम्हाला या हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. हिंदू वारसा कायद्यानुसार आम्ही संयुक्त कुटुंबाचे सदस्य असून, त्यानुसार आमचा संपत्तीतील हक्क आमचे माता-पिताही परस्पर सोडू शकत नाहीत.