Join us

सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना सोपी

By admin | Updated: May 11, 2016 03:19 IST

बहुप्रतीक्षित सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना अत्यंत सोपी राहणार असल्याचे वृत्त आहे, तसेच जून-जुलैपासून आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित सातव्या वेतन आयोगाची वेतन रचना अत्यंत सोपी राहणार असल्याचे वृत्त आहे, तसेच जून-जुलैपासून आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.प्राप्त माहितीनुसार, सातव्या वेतन आयोगाची रचना एकपदरी असणार आहे. आतापर्यंतच्या वेतन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे ती दुपदरी नसेल. दुपदरी रचनेत एक ‘पे बँड’ असतो, तसेच त्याच्या जोडीला ‘पे ग्रेड’ असतो. ही रचना सातव्या वेतन आयोगाने टाळली आहे.त्याऐवजी वेतनात एकच बँड असेल. सातव्या आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे.