Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांदीला झळाळी

By admin | Updated: July 2, 2016 04:14 IST

शुक्रवारी सोने २00 रुपयांनी महागले. त्याबरोबर राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ३0,५५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. चांदी तब्बल १,३00 रुपयांनी वाढून ४४,६00 रुपये किलो झाली.

नवी दिल्ली : शुक्रवारी सोने २00 रुपयांनी महागले. त्याबरोबर राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ३0,५५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. चांदी तब्बल १,३00 रुपयांनी वाढून ४४,६00 रुपये किलो झाली. जागतिक पातळीवरील तेजी आणि स्थानिक पातळीवर वाढलेली खरेदी याचा लाभ सोन्याला झाला. औद्योगिक क्षेत्राकडून, तसेच नाणे निर्मात्यांकडून खरेदी वाढल्याने चांदीचा भाव तेजाळला, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.८ टक्क्यांनी वाढून १,३३२.१७ डॉलर प्रति औंस झाले. चांदी ३.६ टक्क्यांनी वाढून १९.३९ डॉलर प्रति औंस झाली. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २00 रुपयांनी वाढून अनुक्रमे ३0,५५0 रुपये आणि ३0,४00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)