Join us  

चौधरी यात्रा कंपनीची लक्षणीय कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 5:08 AM

नुकत्याच संपत असलेल्या आर्थिक वर्षामध्ये चौधरी यात्रा या पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनीने लक्षणीय कामगिरी केली आहे.

नाशिक : नुकत्याच संपत असलेल्या आर्थिक वर्षामध्ये चौधरी यात्रा या पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनीने लक्षणीय कामगिरी केली आहे. पुढील आर्थिक वर्षात कंपनीने ४६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती कंपनीचे चेअरमन चतुर्भुज चौधरी व फायनान्स डायरेक्टर महेंद्रपाल चौधरी यांनी दिली.कंपनीची तिमाही सर्वसाधारण सभा नुकतीच कैलास मठ, भक्तिधाम येथील सभागृहात संपन्न झाली.त्याप्रसंगी ते बोलत होते.अष्टविनायक, द्वारका, राजस्थान, हिमाचल दर्शन, सिमला, कुलू-मनाली, द.भारत, केरळ, अंदमान, नेपाळ, दार्जिलिंग, गंगटोक, बद्रिनाथ, केदारनाथ, अमरनाथ, गंगासागर, जगन्नाथपुरी, रामेश्वरम, काशी, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, दुबई, श्रीलंका, कैलास मानसरोवर आदी यात्रांद्वारे २०२१ पर्यंत ६५,००० यात्रेकरूंना यशस्वी यात्रा करवून १०० कोटींचे व्यावसायिक उद्दिष्ट गाठण्याचे लक्ष्यही ठेवल्याचेचौधरी यांनी सांगितले. (वाणिज्य प्रतिनिधी)