नवी दिल्ली : स्वस्तातील कर्ज, विदेशी बाजारातून उत्तम आर्थिक संपर्क, रोखीचा मजबूत प्रवाह आणि आर्थिक व्यवहारांना वेग आल्यामुळे एकूण भारताच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे. रिझर्व्ह बँकेची पाचवी द्वैमासिक धोरण बैठक येत्या मंगळवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योग संघटना सीसीआय आणि आयबीएने केलेल्या पाहणीत वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. या पाहणीने आर्थिक स्थिती सूचकांक चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान वाढून ७०.३ वर पोहोचला. तो गेल्या तिमाहीत ६७.८ वर होता. सीआयआयने निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०१५-२०१६ च्या तिसऱ्या तिमाहीदरम्यान सीसीआय-आयबीएचा आर्थिक स्थिती सूचकांक ५० च्या पायरीपेक्षा खूप वर म्हणजे ७०.३ होता. सूचकांकावरून हे स्पष्ट होते की, पाहणीमध्ये सहभागी झालेल्या बहुतेक बँका आणि आर्थिक संस्थांनी सरासरी आर्थिक स्थितीत सुधारणेचा व त्याआधीच्या तिमाहीमध्ये घसरणीचा उल्लेख केला होता. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एकूण सुधारणा होत असल्याचे बघणे सुखद असल्याचे अहवालात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगल्या सुधारणांचे संकेत
By admin | Updated: November 30, 2015 00:52 IST