Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी सिंगल बातम्या़़

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

हिरकणी कक्ष होणार

हिरकणी कक्ष होणार
सोलापूर: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरकणी कक्ष बांधला जाणार आह़े यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधी खर्च केला जाणार आह़े जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत कक्ष, इतर सुविधा करण्यावरही भर देण्यात आला आह़े येत्या वर्षभरात या सुविधा केल्या जातील़
दुष्काळ जाहीर करा
सोलापूर: जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आह़े जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी हे निवेदन दिले आह़े शेतकर्‍यांना प्रति एकरी 50 हजार अनुदान द्यावे, वीज बिल अन् कर्ज माफ करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़
फुटपाथावर दुकानदार
सोलापूर: महापालिकेच्या वतीने जिल्हा परिषदशेजारी केलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा फुटपाथ बांधण्याचे काम सुरू असून, या फुटपाथावर लागलीच दुकाने थाटली आहेत़ पूर्वी ज्या ठिकाणी टपर्‍या होत्या त्या ठिकाणी ही दुकाने सुरू होऊ लागली आहेत़ झेरॉक्स, पानटपरी तसेच चहाच्या गाड्यांनी आपले व्यवसाय या ठिकाणी थाटले आहेत़
पार्क चौकात खड्डा
सोलापूर: पार्क चौकात हायमास्टची जागा बदलण्यासाठी खोदलेला खड्डा गेल्या आठ दिवसांपासून ‘जैसे थे’ आह़े या परिसरात अनेक विद्युत दिवे आहेत़ लखलखाट या चौकात असताना पुन्हा सुमारे दीड लाख रुपये खचरून हायमास्टची जागा बदलण्याचे काम सुरू झाले होते, ते अर्धवट स्थितीत आह़े