Join us  

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे १२ हजार कोटींच्या व्यवसायाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 7:26 AM

आॅनलाइन कंपन्यांविरुद्ध अ. भा. व्यापारी महासंघाने पुकारलेला देशव्यापी बंद यशस्वी झाला. फक्त मुंबई, ठाणे परिसरात किरकोळ व्यापारी बंदपासून दूर राहिले.

मुंबई  - आॅनलाइन कंपन्यांविरुद्ध अ. भा. व्यापारी महासंघाने पुकारलेला देशव्यापी बंद यशस्वी झाला. फक्त मुंबई, ठाणे परिसरात किरकोळ व्यापारी बंदपासून दूर राहिले.नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, नागपूर येथील घाऊक बाजार व किरकोळ बाजारपेठा बंद होत्या. राज्यातील २,८०० कोटी व देशभरातील १२ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाला बंदमुळे फटका बसला. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार व आॅनलाइन कंपन्यामुळे धोक्यात आलेला परंपरागत व्यापार वाचविण्यास स्वतंत्र धोरण आणावे, ही मागणी बंदद्वारे करण्यात आली.महासंघाचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले की, किरकोळ क्षेत्रात वर्षाला ४२ लाख कोटींची उलाढाल होते. हा व्यवसाय वाचविण्यास व्यापाºयांनी पहिल्यांदाच देशव्यापी बंद पुकारला. त्याला २० हजार संघटनांनी पाठिंबा दिला. ७ कोटी व्यापारी सरकारबाबत नाराज आहेत, हे यामुळे स्पष्ट झाले.आॅनलाइन औषधे विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनीही बंद पुकारला होता. हा बंद १०० टक्के यशस्वी झाला. त्यामुळे अनेक रुग्णालय परिसरात रुग्णांचे हाल झाले.

टॅग्स :भारत बंदबातम्या