चौकट====प्रशासनापुढे पेच नाशिक व त्र्यंबकेश्वर मिळून तेरा आखाडे असून, पारंपरिकपणे प्रशासन या तेरा आखाडे व त्याच्याशी संलग्न खालशांचीच व्यवस्था करीत आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनातही याच आखाड्यांना महत्त्व व अधिकार देण्यात आले असल्याने नव्याने दाखल होणार्या महिला साध्वींच्या आखाड्याला अनुमती द्यावी की नाही अशा पेचात प्रशासन सापडले आहे. मेळा अधिकारी महेश पाटील यांनी श्री त्रिकाल भवन्ताजी यांच्यासमोर आपल्या मर्यादा विशद केल्या व शाहीस्नानासाठी स्वतंत्र वेळ व जागा देण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील, असे सांगितले. आखाड्यांच्या या वादात प्रशासन पडू इच्छित नाही.
शााहीस्नान- जोड
By admin | Updated: September 19, 2014 00:31 IST