Join us

शहाद्यात लाचखोर सहायक लेखाधिकार्‍यास अटक

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST


नंदुरबार : शहादा पंचायत समितीमधील सहायक लेखाधिकारी सुरेश जगन्नाथ सूर्यवंशी यास दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले. लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ही कारवाई केली.
कहाटूळ येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुदाम इंदास पाटील यांच्या मुलीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली. त्याचा ३८ हजार रुपये खर्च झाला. या वैद्यकीय बिलास गटशिक्षणाधिकार्‍यांनी मंजुरीही दिली. परंतु संबंधित रक्कम मंजूर होण्यासाठी सुरेश सूर्यवंशी यांनी सुदाम पाटील यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती दीड हजार रुपये देण्याचे ठरले. पाटील यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविसे. त्यानुसार, सापळा रचून पथकाने सूर्यवंशी यास लाच घेताना पकडले. (प्रतिनिधी)