Join us
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोग लांबणार

By admin | Updated: April 8, 2016 03:11 IST

केंद्र सरकारच्या लक्षावधी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी-साठी आणखी वाट बघावी लागणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या लक्षावधी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी-साठी आणखी वाट बघावी लागणार आहे. आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी सरकारने सचिवांची उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. शिफारशींबाबत या समितीकडे अनेक तक्रारी व आक्षेप आलेले आहेत. शिफारशींबाबत अंतिम निर्णय घ्यायच्या आधी संयुक्त सल्ला यंत्रणेने जे प्रश्न उपस्थित केले आहेत ते या समितीला सोडवायचे आहेत. त्यामुळे अंमलबजावणीला विलंब होऊ शकतो. मंत्रिमंडळ सचिव पी.के. सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील या समितीच्या अभ्यासाचा ४७ लाख कर्मचारी आणि ५२ लाख सेवानिवृत्तीधारकांवर परिणाम होणार आहे. शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी तिजोरीवर २०१६-२०१७ या वर्षात अतिरिक्त १.०२ लाख कोटी रुपयांचे ओझे वाढणार आहे. शिफारशींची अंमलबजावणी १ जानेवारी २०१६ पासून होईल.