Join us

सिंधी कॅम्प भागात सात अवैध नळ कनेक्शन खंडित ८० हजारांचा दंड; मनपाची कारवाई

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST

अकोला :मनपाच्यावतीने सिंधी कॅम्प परिसरात सात अवैध नळ जोडण्या शोधून त्या खंडित करण्यात आल्या. या प्रकरणी संबंधितांना ८० हजार ७१२ रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई शनिवारी करण्यात आली. यामध्ये गुरुनानक विद्यालयाचा समावेश आहे.

सिंधी कॅम्प भागातील गुरु नानक विद्यालयातील एक अवैध नळ जोडणी, वनपरिक्षेत्र कर्मचारी निवासस्थान-२, इंग्लिश कॉन्व्हेंट-१, विद्यारतन कॉम्प्लेक्स-१ यांसह दोन नळ जोडण्या खंडित केल्या.

बॉक्स..
टिळक रोड, कॉटन मार्केटमधील अतिक्रमण हटविले
मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्यावतीने शनिवारी टिळक रोड, मानेक टॉकीज ते लक्कडगंज, दगडीपुल, कॉटन मार्केट आदी परिसरातील रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईत सहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे, अतिक्रमण विभागप्रमुख विष्णू डोंगरे, प्रवीण मिश्रा, संजय थोरात, विनोद वानखडे, मिलिंद वानखडे, योगेश माने, बाबाराव शिरसाट यांचा सहभाग होता.