नवी दिल्ली : महागाई ओसरली असताना सेवा क्षेत्राचा वृद्धीदर सलग दुसऱ्या महिन्यात घटल्यामुळे रिझर्व्ह बँकेस दरकपातीसाठी पुरेसा वाव निर्माण झाला आहे. एचएसबीसीने केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब आढळून आली. या सर्वेक्षणात म्हटले आहे की, सलग दुसऱ्या महिन्यात सेवाक्षेत्राला फटका बसला. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांची कपात होण्यासह नव्या नियुक्त्यांबाबत सावध पवित्रा घेण्यात येत आहे. विविध कंपन्यांच्या हालचालीतील बदलाचा आढावा घेणारा ‘एचएसबीसी इंडिया सेवा व्यापार हालचाली निर्देशांक’ एप्रिलमध्ये घटून तीन महिन्यांतील सर्वात नीचांकी स्तर ५२.४ वर पोहोचला. हा निर्देशांक मार्चमध्ये ५३ वर होता. या निर्देशांकाचे ५० वर राहणे वृद्धी दर्शविते तर त्याखाली राहण्याचा अर्थ नुकसान आहे. एप्रिल महिन्यात भारतीय सेवा क्षेत्रात मंदीमुळे मागणीत घट होण्याचे संकेत मिळतात.दरम्यान, एप्रिलच्या आकडेवारीवरून भारतीय सेवा क्षेत्रात कर्मचाऱ्यांची कपात झाल्याचे स्पष्ट होते; मात्र या कपातीचे प्रमाण किरकोळ आहे.
सेवा क्षेत्रात एप्रिलमध्ये मंदी; दरकपातीची आशा वृद्धिंगत
By admin | Updated: May 6, 2015 22:22 IST