Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सेवाकर होणार १४ टक्के

By admin | Updated: May 31, 2015 23:41 IST

शिक्षण उपकरासह १२.३६ टक्के असलेला सेवाकर १ जूनपासून १४ टक्के होत आहे. त्यामुळे मोबाईलवरील बोलणे, हॉटेलमध्ये जेवण करणे

नवी दिल्ली : शिक्षण उपकरासह १२.३६ टक्के असलेला सेवाकर १ जूनपासून १४ टक्के होत आहे. त्यामुळे मोबाईलवरील बोलणे, हॉटेलमध्ये जेवण करणे, प्रवास करणे यासह सर्व सेवा महागणार आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात सेवाकर वाढविण्याची घोषणा केली होती. काही मोजक्या विशिष्ट सेवा वगळता सर्व प्रकारच्या सेवांवर सेवाकर लागतो. रेल्वे, विमान, बँकिंग, विमा, जाहिरात, आर्किटेक्चर, बांधकाम, के्रडिट कार्ड, कार्यक्रम व्यवस्थापन आणि टूर आॅपरेटिंग आदी सेवांना वाढीव सेवाकर लागू होणार आहे. मोबाईल आॅपरेटर आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आधीच वाढीव सेवाकराचे संदेश पाठविणे सुरू केले आहे. अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) व्यवस्थेत सुगमता आणण्यासाठी सेवाकर १४ टक्के केला आहे. जीएसटी एप्रिल २0१६ पासून लागू होणार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर सेवाकर, उत्पादन शुल्क आणि अन्य स्थानिक शुल्क त्यात समाविष्ट होऊन जातील.