मुंबई : भारतीय शेअर बाजारांत सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६0.९५ अंकांनी घसरून २७,१७६.९९ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा साडेतीन महिन्यांतील नीचांक ठरला आहे.३१ मार्चला संपलेल्या तिमाहीतील कंपन्यांची कामगिरी जाहीर होत आहे. बहुतांश बड्या कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे चमकदार राहिलेली नाही. त्यामुळे बाजारात थोडेसे निराशेचे वातावरण आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत असल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ७७५.४६ कोटी रुपयांचे समभाग विकले. दुसरीकडे आशियाई बाजारातही नरमाईचा कल दिसून आला. या सर्वांचा परिणाम म्हणून भारतीय बाजार कोसळले आहेत. मारुतीच्या नफ्यात मोठी वाढ झाल्यामुळे बाजाराला थोडे सावरले.बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीने उघडला होता. १२९ अंकांची घसघशीत वाढही त्याने नोंदविली होती. त्यानंतर मात्र नफा वसुलीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे तो २७,१४१.५५ अंकांपर्यंत खाली घसरला. सत्र अखेरीस २६0.९५ अंकांची अथवा 0.९५ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २७,१७६.९९ अंकांवर बंद झाला. ७ जानेवारीनंतरची ही सेन्सेक्सची सर्वाधिक नीचांकी पातळी ठरली आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २६,९0८.८२ अंकांवर बंद झाला होता. मागील ३ सत्रांत सेन्सेक्सने ७१३.१४ अंक गमावले आहेत. सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३0 कंपन्यांपैकी २३ कंपन्यांचे समभाग घसरले. बीएसई स्मॉलकॅप २.८५ टक्क्यांनी तर मीडकॅप २.१0 टक्क्यांनी घसरला. (वृत्तसंस्था)४५0 कंपन्यांचा समावेश असलेला एनएसई निफ्टी ९१.४५ अंकांनी अथवा १.१0 टक्क्यांनी घसरून ८,२१३.८0 अंकांवर बंद झाला. त्याआधी तो सारखा वर खाली होताना दिसून आला. ४आयसीआयसीआय बँकेचा समभाग १.८५ अंकांनी घसरला. वास्तविक कंपनीने १0.२ टक्क्यांनी वाढ नोंदवून २,९२२ कोटी रुपयांचा नफा चौथ्या तिमाहीत कमावला आहे. ४तरीही कंपनीचा समभाग घसरला. घसरण सोसावी लागलेल्या अन्य बड्या कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डीज, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, गेल, सिप्ला, सन फार्मा, अॅक्सिस बँक, हिंदाल्को, आरआयएल, ओएनजीसी आणि हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश आहे.
साडेतीन महिन्यांच्या नीचांकावर सेन्सेक्स
By admin | Updated: April 27, 2015 23:04 IST