ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने मंगळवारी 516.06 अंकांची गटांगळी खाल्ली आहे. जागतिक बाजारातील मंदी, रिझर्व्ह बँकेने अपेक्षेएवढीच केलेली व्याजदर कपात आणि नफेखोरी यामुळे शेअर बाजारात विक्रीचे उधाण आले आणि सेन्सेक्स 25 हजारांच्या खाली येत 24,883.59 वर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकानेही 155.60 अंकांची घसरण घेतली आणि तो 7,603.20 वर बंद झाला.
आरबीआयचा व्याजदर कपातीचा निर्णय तज्ज्ञांना अपेक्षित होता, मात्र त्यामुळे बाजारात उत्साह होण्यास मदत झाली नाही.