मुंबई : बाजारात सलग चार दिवसांच्या तेजीनंतर आज मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफेखोरी झाल्याने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये घसरण नोंदली गेली आहे. सेन्सेक्सने आपली नवी विक्रमी पातळी २७,९६९.८२ अंकांला स्पर्श केल्यानंतर पाच अंकांच्या घसरणीसह २७,८६०.३८ अंकांवर बंद झाला. लागोपाठ तीन दिवस वेगवेगळ््या विक्रमांना गवसणी घातल्यानंतर सेन्सेक्सने दिवसभरात नवी उंची कायम ठेवली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १.९५ अंक वा ०.०२ टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह ८,३२४.१४ अंकांच्या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान, निफ्टीही आपली विक्रमी पातळी ८,३५०.६० अंकांवर पोहोचला. आज बाजार धारणा सुस्त होती. कारण आगामी काळातील सुट्यांमुळे गुंतवणूकदार बाजारात अधिक रस दाखवत नाहीत.रेलिगेअर सिक्युरिटीजचे अध्यक्ष (किरकोळ वितरण) जयंत मांगलिक यांनी सांगितले की, एका चांगल्या आठवड्यानंतर बाजार मर्यादित कक्षेत मजबूत राहिला. महसुली तूटचे संपूर्ण वर्षाचे लक्ष्य ८३ टक्क्यांवर पोहोचल्यानेही बाजार धारणा नकारात्मक झाली. याशिवाय पायाभूत उद्योग क्षेत्राचा वृद्धीदरही सप्टेंबरमध्ये कमी होऊन १.९ टक्क्यांवर आला. (प्रतिनिधी)
उच्च स्थानावरून सेन्सेक्सची घसरण
By admin | Updated: November 4, 2014 02:26 IST